सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने काय होते? 

17 June 2025

Created By: Namrata Patil

कडुलिंब हा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला वृक्ष आहे. त्याची पाने विशेषतः अनेक रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

कडुलिंबातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

कडुलिंबाची पाने खाल्ल्याने सर्दी-खोकला आणि इतर हंगामी आजारांपासून संरक्षण मिळते.

कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी कडुलिंबाची पाने खावीत.

कडुलिंबाची पाने खाल्ल्याने पचन सुधारते. यामुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया बाहेर पडतो. त्यामुळे संतुलन राखते.

कडुलिंबाच्या पानांमुळे पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसची समस्या कमी होते.

कडुलिंब हे केसांच्या समस्यांवर उपायकारक आहेत. ते कोंडा आणि टाळूच्या इन्फेक्शनला प्रतिबंध करते. यामुळे केस मजबूत राहतात.

कडुलिंबामुळे हिरड्यांची सूज, कॅविटी आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. 

कडुलिंबामुळे  संपूर्ण आरोग्य सुधारते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.