द्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे

द्राक्ष बियांच्या तेलात ओमेगा फॅटी अॅसिडस् आणि व्हिटॅमिन ई असतात. हे त्वचेसाठी टॉनिक म्हणून कार्य करते. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचा सुंदर ठेवण्यासाठी कार्य करतात. त्वचा संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी हे तेल अत्यंत फायदेशीर आहे.

द्राक्ष बियांच्या तेलात लिनोलिक अॅसिड असते. ज्यामध्ये ओमेगा-6 फॅटी अॅसिड असते. हे मुरुमावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

मुरुमावर गुणकारी

द्राक्ष बियांच्या तेलात असलेले व्हिटॅमिन ई आणि लिनोलिक अॅसिड हे घटक काळे डाग आणि सनस्पॉट्स हलके करू शकतात.

काळ्या डागांवर उपयुक्त

द्राक्ष बियांच्या तेलातील कॅरोटीन्स, जीवनसत्त्वे सी, डी, ई आणि पॉलीफेनॉल या घटकांमुळे रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते.

रॅडिकल्सपासून संरक्षण

द्राक्ष बियांचे  तेल व्हिटॅमिन ईमध्ये समृद्ध असते. जे त्वचेला मॉइस्चराइझ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

त्वचेला ओलावा मिळतो

द्राक्ष बियांच्या तेलात पॉलिफेनॉल असते. हे अकाली वृद्धत्व आणि सुरकुत्या रोखण्यास मदत करते.

सुरकुत्यांवर प्रभावी

आपल्या त्वचेवर नियमितपणे द्राक्ष बियांचे तेल लावल्याने त्वचेत व्हिटॅमिन ई आणि सी दोन्ही मिळते. यामुळे आपली त्वचा सुंदर बनते.

सुंदर त्वचा