Honda activa ला जोरदार टक्कर, 83 हजार मिळतेय ही फॅमिली स्कूटर

22 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

 ज्यांना स्कूटर खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपल्या प्रसिद्ध स्कुटर Suzuki access 125 ला नव्या अवतारात आणले आहे.

आता कंपनीने या लोकप्रिय स्कूटरला दोन नव्या कलरमध्ये बाजारात आणलंय.काही व्हेरिएंटमध्ये नवीन कलरचे पर्याय आहेत.

 Suzuki access 125 ला आता कंपनीने मेटलिक रॉयल ब्राँझ आणि मॅटेलिक मॅट बोरडॉक्ट रेड कलर ऑप्शनमध्ये सादर केले आहे.

रॉयल ब्राँझ कलर राईड कनेक्ट एडिशनमध्ये उपलब्ध होईल. तर मॅट बोरडॉक्स रेड कलर केवळ टॉप व्हेरिएंट मिळते.

याच्या इंजिन मॅकेनिझ्ममध्ये कोणताही बदल नाही. यात आधी प्रमाणे 125 सीसी सिंगल-सिलिंडर, फोर-स्ट्राँग, SOHC, 2- वॉल्व आणि एअर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे.

याच्या सिटच्या खाली २४.४ लिटरचा स्टोरेज स्पेस आहे. तसेच एक्सटर्नल फ्लूल, मोठा फ्लोअरबोर्ड आणि लांब आणि रुंद सिट दिली आहे. ज्यामुळे सामान ठेवणे आणखी सोपे होणार आहे.

यात ब्ल्युट्रुथ कनेक्टिविटी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. याच्याद्वारे रायडर आपल्या स्मार्टफोनला स्कूटरशी कनेक्टर करु शकतो.

महागड्या टॉप व्हेरिएंटमध्ये ४.२ इंचाचा कलर TFT स्क्रीन दिली होती. सेफ्टीसाठी यात सिंगल-चॅनल एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) मिळते.

 बाजारात या स्कूटरचा मुकाबला एक्टीव्हा १२५ आणि ज्युपिटर १२५ याच्याशी आहे. ज्यांची किंमत अनुक्रमे ८९,६५६ आणि ८३,००० रुपये.