महिंद्राच्या बॅटमन कारची धूमssss! बुकिंगसाठी उडाली धावपळ

23 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

महिंद्राने नुकतीच बीई 6 चं नवं बॅटमॅन एडिशन लाँच केलं आहे. या गाडीचे फक्त 999 युनिट तयार केले आहेत.

या गाडीसाठी शनिवारपासून बुकिंग सुरु झाली आहे. पण पहिल्याच दिवशी कारप्रेमींची झुंबड उडाली. 

या गाडीची किंमत 27.79 लाख असून मॉडेल इलेक्ट्रिक एसयुव्ही कारच्या टॉप मॉडेल पॅक थ्रीवर आधारित आहे. 

या गाडीला एलईडी हेडलाईट, सी शेप एलईडी डीआरएल, एलईडी फॉग लँप्स आणि सी आकाराचे एलईडी टेल लाईट आहेत. 

केबिनचं डिझाईन तसंच आहे. पण ऑल ब्लॅक थीमवर असून ड्रायव्हरच्या आसपास हेलो शेप एलिमेंट्सवर येलो फिनिश दिलं आहे. 

पॅनोरमिक ग्लास रूफ असून लायटिंग एलिमेंट्स दिलं गेलं आहे. रात्री ही गाडी अधिक आकर्षक दिसेल. 

यात दोन 12.3 इंचाची स्क्रिन, 16 स्पीकर हरमन कार्डन साउंड सिस्टम आणि ऑगमेंटेड रियल्टी बेस्ड हेड्सअप डिस्प्ले दिला आहे. 

घरातील झुरळांचा सुळसुळाट संपण्याचे सहा प्रभावी मार्ग, जाणून घ्या