८ लाखात येणारी ही कार आता २ महिन्यांनी मिळणार,वेटिंग पिरीयड वाढला
4 february 2025
Created By: atul kambl
e
५ स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या या कारची डिलिव्हरी सुरू होताच, या कारचा वेटिंग पीरियड खूपच वाढला आहे.
तुम्ही आजच स्कोडाची नवीन SUV बुक केली तर तुम्हाला २ महिन्यांनी कार मिळेल.मॉडेल्सनूसार हा प्रतीक्षा कालावधी वेगळा असू शकतो
स्कोडाच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ७.८९ लाख रुपये आहे. टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १४.४० लाख रुपये आहे.
६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स कार १९.०५ किमी/लिटर मायलेज देते. ६-स्पीड टॉर्क कर्व्हटर मॉडेल १९.६८ किमी प्रति लिटर मायलेज देते.
या कारमध्ये ६ एअरबॅग्ज दिल्या आहेत, त्याशिवाय २५ हून अधिक इतर सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
टॉप व्हेरियंटमध्ये १०-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, ८-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि सनरूफसारखी वैशिष्ट्ये आहेत
भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारने प्रौढांच्या सुरक्षेमध्ये ३२ पैकी ३०.८८ गुण मिळाल्यामुळे ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.
या एसयूव्हीला लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ४९ पैकी ४५ गुण मिळाल्याने ५ स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे.
अभ्यासातही आहे हुशार जन्नत जुबैर, पाहा किती शिकलेय...