5.65 लाखांपासून सुरु होते या 7 सिटर कारची किंमत

Created By: Atul Kamble

19 FEB 2026

 निसानने नवी सब ४ मीटर MPV Gravite कारला लाँच केले आहे. रेनो ट्रायबर वरील बेस्ड या  MPV चा एक्सटीरिअर आणि इंटेरिअर सर्वात वेगळे असून तिला वेगळी ओळख देत आहे.

ग्रेव्हाईटच्या लाँच सह निसान कंपनीने आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोत वाढवत भारतात आपली पकड मजबूत करु इच्छीत आहे.

ग्रॅव्हाइट चार पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: व्हिसा, एसेंटा, एन-कनेक्टा आणि टेकना. व्हेरिएंटनुसार किंमती जाणायच्या असतील तर माहिती घेऊयात.

ग्रेव्हाइटची किंमत ५.६५  ते ८.९३ लाखांपर्यंत आहे. चला प्रत्येक प्रकाराच्या किंमतीवर एक नजर टाकूया. निसान ग्रॅव्हाइटची बुकिंग सुरू झाली आहे आणि मार्च २०२६ मध्ये डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 निसान ग्रेव्हाइट कारमध्ये वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मागील व्हेंट्ससह मॅन्युअल एसी, ७-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पुश बटण स्टार्टसह कीलेस एंट्री अशी वैशिष्ट्ये आहेत.

सेफ्टी फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये ६ एअरबॅग्ज (मानक), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), EBD सह ABS, कॅमेरासह मागील पार्किंग सेन्सर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) असेल.

 यात सिंगल १-लिटर, ३-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे, जे ७२ पीएस पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क निर्माण करते. ही एमपीव्ही ५-स्पीड एमटी आणि ५-स्पीड एएमटी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

ही कार एका लिटर तेलात १९.३ किलोमीटरपर्यंत ( मॅन्युअल ) आणि १९.६ किमी ( स्वयंचलित ) मायलेज देते.