आता फॉर्च्युनर गाडी आणखी होणार सुरक्षित आणि स्मार्ट, कसं ते समजून घ्या

7 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

2009 मध्ये लाँच झालेल्या प्रीमियर एसयुव्ही सेगमेंटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.  7 सीटर ऑफ रोड, मजबूत इंजिन आणि डिझाईनमुळे ही गाडी लोकप्रिय आहे.

गेल्या काही वर्षात सर्वाधिक विकली जाणारी प्रीमियर थ्री रो एसयुव्ही आहे. गाडी लाँच झाल्यापासून काही छोटे अपडेट आणि एका पिढीचं अपग्रेड झालं आहे.

या गाडीचं दुसरं मॉडेल 2016 मध्ये लाँच केलं होतं. आता आणखी अपग्रेड मॉडेल लाँच करण्याची तयारी आहे. पण याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. टोयोटा फॉर्च्युनर न्यू जनरेशन 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या पिढीच्या मॉडेलमध्ये नवीन टोयोटा हिलक्सचे डिझाईन आणि वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा आहे. या गाडीचे डिझाईन इंटरनेटवर लीक झाले होते.

नवीन पिकअप दक्षिण पूर्व आशियाई बाजारात परीक्षणावेळी दिसली होती. या गाडीचं डिझााईन नव्या हिलक्ससारखं असू शकतं.

लीकनुसार, यात एक मोठं ग्रिल, एलईडी डीआरएल, एलईडी हॅडलँप, नवं बम्पर आणि एडीएस सहभागी असेल.

लीकनुसार, नव्या डिझाईनचे अलॉय व्हील आणि नवी एलईडी टेललाईट्स असतील.  नवा डॅशबोर्ड आणि सेंटर कंसोल असेल.

यात मोठं फ्री स्टँडिंग इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे. वेंटिलेटेड सीट आणि काही प्रिमियम फीचर्स असू शकतात.

व्हॉट्सॲप चॅट लपवायचं आहे का? मग या स्टेप फॉलो करा