पितृपक्षात 

'हे' टाळा

मांसाहार, मद्यपान, नशा 

 पितृपक्षात मृत आप्तेष्टांचा अर्थात पितरांचा अपमान करू नका. या दिवसांत मांसाहार करू नका. मद्यपान करणे टाळा. तसेच कोणत्याही प्रकारची नशा करणे टाळा.

नखे कापू नका,ब्रह्मचर्य पाळा

पितृपक्षात नखे कापू नका. ब्रह्मचर्य पाळा. केसांची स्टाइल करणे टाळा. श्राद्ध विधीचा भाग म्हणून केश त्याग करावा. पण एरवी पितृपक्षात केस कापू नये.

सूर्यास्तानंतर श्राद्ध टाळा

सूर्योदयापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंतची वेळ श्राद्ध विधीसाठी योग्य समजली जाते. सूर्यास्तानंतर श्राद्ध विधी करणे टाळा.

लोकांना त्रास देऊ नका

पितृपक्षात लोकांना विशेष करुन मुले, महिला, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांना त्रास देऊ नका. यथाशक्ती जनसेवा करा.

केळीच्या पानावर जेवा

पितृपक्षात स्वतः तसेच श्राद्ध विधीसाठी आलेले गुरुजी (ब्राह्मण) यांनी केळीच्या पानावर जेवावे. स्वयंपाक करण्यासाठी आणि जेवण वाढण्यासाठी धातूच्या वस्तूंचा/भांड्यांचा वापर करावा.

शुभ कार्य टाळा

जावळ करणे, साखरपुडा, लग्न, वाहन खरेदी, घर खरेदी, भूखंड खरेदी अथवा कोणताही मोठा मालमत्तेशी संबंधित आर्थिक व्यवहार तसेच महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी पितृपक्षात करणे टाळा.