मायक्रोवेव्ह वापरताना ‘या’ गोष्टी टाळा

आजकाल स्वयंपाकघरातील महत्वाच्या उपकरणांत मायक्रोवेव्हचा समावेश हमखास होतो. मायक्रोवेव्हमधून आधुनिक ‘धग’ मिळत असली तरी फायद्यासोबत त्याचे तोटेही लक्षात घेणं महत्वाचे ठरते. प्रत्येक पदार्थाला मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याचे टाळायला हवे. 

मायक्रोवेव्हमध्ये मशरुम गरम केल्याने त्याचे पोषकतत्व नष्ट होते. मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या मशरुममुळे तुमच्या शरीराचे पचनतंत्र बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मशरुम

चिकन मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यामुळे त्याच्या प्रथिन संरचनेत मोठा बदल होतो. अशाप्रकारचे चिकन सेवन केल्यामुळे तुमच्या पचनतंत्रावर निश्तितच परिणाम होऊ शकेल

चिकन

 मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या भाताचा जेवणात समावेश केल्यामुळे अन्नातून होणाऱ्या विषबाधेला सामोरे जावे लागते. उलट, मळमळ यांसारखे त्रास तुम्हाला उद्भवू शकतात.

भात

मायक्रोवेव्हमध्ये अंड उकळल्यामुळे त्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे अंड खाण्यायोग्य राहत नाही तसेच अंड्याचे पोषक तत्व नाहीशे होते.

अंडी