कोरफड त्वचेला हानी पोहोचवू शकते का?

20 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

कोरफडीमध्ये फॉलिक अॅसिड, झिंक, व्हिटॅमीन अ, ई आणि सी सारखे पोषक घटक आढळतात. ते त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

अनेकजण त्वचेला चमकदार बनवण्यासाठी कोरफडीचा वापर करतात. कोरफडीचा गर (जेल) लावतात

कोरफड त्वचेसाठी फायदेशीर असते पण त्याचा वापर योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात केला पाहिजे.

कोरफड त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. ते सूर्यप्रकाशाच्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करते.

त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी कोरफड फायदेशीर असते

आजकाल बाजारात अनेक कोरफडीचे प्रोडक्ट उपलब्ध आहेत.

बाजारातील जेलमध्ये त्वचेला हानी पोहोचवणारे रसायने असू शकतात. म्हणून, नैसर्गिक कोरफडीचा वापर करण्याचा प्रयत्न करा.