उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे
कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट, बी, सी आणि डी जीवनसत्त्वं आढळतात.
कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते. शरीराला उर्जाही मिळते.
नियमित कलिंगड खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.
कलिंगडमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो.
कलिंगडामुळे पोट थंड राहते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.
कलिंगड खाल्ल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
कलिंगड खाण्याने तुमचे पोट स्वच्छ राहते. यामुळे पचनतंत्रही ठीक राहते.
उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कलिंगड फार उपयुक्त असते.
कलिंगड खाण्याने तुमचे पोट स्वच्छ राहते. यामुळे पचनतंत्रही ठीक राहते.
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना कलिंगड खाल्ल्यास तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते
कलिंगड खाल्ल्याने काम करताना थकवा जाणवत नाही.