उटणे लावण्याचे फायदे

१. त्वचा मुलायम होण्यासाठी

दिवाळी हा थंडीच्या दिवसांत येणारा सण. थंडीमुळे शरीराची त्वचा कोरडी होते. अनेकदा अशा कोरड्या त्वचेमुळे आगही होते. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी पूर्वीपासून उटण्याचा वापर केला जातो. उटण्यामधील आयुर्वेदिक घटकांमुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन ती मुलायम होण्यास सुरुवात होते.

२. नैसर्गिकरित्या चमक देते

उटण्यामध्ये रक्तचंदन, वाळा, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा यासारख्या वनस्पती आणि खोडांचा वापर केला जातो. हे घटक त्वचेला स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते.

३. सुरकुत्या टाळणे शक्य

वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या हे अतिशय सामान्य आहे. उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते.

४. चेहऱ्यावरील केसांची वाढ रोखण्यास उपयुक्त

चेहऱ्यावरील किंवा हाता-पायावरील केस जास्त वाढू नयेत यासाठी लहानपणी बाळाला आंघोळ घालताना मसुराच्या डाळीचे पिठ किंवा हरभरा डाळीच्या पिठ लावले जाते. मात्र तरीही हे केस कमी न झाल्यास उटणे हा अतिशय उत्तम पर्याय असतो.