भोंडला भुलाबाई

भोंडला भुलाबाई

भोंडला किंवा भुलाबाई किंवा हादगा हा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे.

भोंडला भुलाबाई

आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरु होणारा भोंडला मुलींचा विशेष आवडता सण.

भोंडला भुलाबाई

घटस्थापनेपासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.

भोंडला भुलाबाई

एका पाटावर हत्तीची प्रतिमा काढून त्याची पूजा करतात.

भोंडला भुलाबाई

या प्रतिमेभोवती फेर धरुन छोट्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.

भोंडला भुलाबाई

ज्या मुलीच्या घरी भोंडला खेळला जातो, तिची आई खिरापत करते.

भोंडला भुलाबाई

घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ तांदूळाचा हत्ती मांडून त्याभोवती फेर धरतात.

भोंडला भुलाबाई

भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात प्रचलित खेळाचा प्रकार आहे.

भोंडला भुलाबाई

याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई, गुलाबाई असे प्रदेशानुसार बदलते.

भोंडला भुलाबाई

'भोंडला' पृथ्वीच्या सुफलीकरणाचा उत्सव म्हणून मानला जातो.