मनोरंजन क्षेत्रात कास्टिंग काऊचचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. आता बिग बॉस फेम शिव ठाकरेनेही अनुभव शेअर केला आहे. 

तो म्हणतो, मुंबईत आल्यावर कळलं फक्त मुलींनाच नव्हे इथे तर मुलांनाही भीती वाटते.

 शिवने सांगितलं की, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो कास्टिंग काऊचची शिकार होण्यापासून थोडक्यात बचावला.

एकदा मी ऑडिशन द्यायला गेलो, तिथे मला एका बाथरूममध्ये नेण्यात आलं आणि सांगितलं इथे एक मसाज सेंटर आहे.

ऑडिशन आणि मसाज सेंटरमधलं कनेक्शन मला काही कळेना. त्याने मला सांगितलं, ऑडिशननंतर तू इथे ये एकदा. तू वर्कआऊट पण करतोस ना..

त्यानंतर मी तिथून सटकलो. कारण तो कास्टिंग डिरेक्टर होता, मलाी त्याच्याशी पंगा घेणं परवडलं नसतं.

तेव्हा मला जाणवलं की इंडस्ट्रीत जेव्हा कास्टिंग काऊचबद्दल बोललं जातं, तेव्हा तिथे मुलगा किंवा मुलगी यांत काहीच भेद नसतो. 

त्यानंतरही शिवची अशा लोकांशी भेट झाली. एका महिलेने त्याला रात्री ऑडिशनसाठी बोलावले. शिवने ती ऑफर सरळ नाकारली. 

अमरावतीच्या शिवने यापूर्वी भलेही अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला असेल, पण आज तो एक स्टार आहे. 

बिग बॉस मराठी नंतर हिंदी बिग बॉसमुळे शिवची लोकप्रियता खूप वाढली. आज त्याचे लाखो फॅन्स आहेत.