ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात घटस्फोट होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

9 February 2024

अभिषेक बच्चन याने या चर्चेदरम्यान मौन सोडले आहे. त्याने ऐश्वर्यासंदर्भात मत व्यक्त केले आहे.

आराध्यामुळे माझे जीवन खूप चांगले बनले आहे. ती आमच्या परिवाराचे संपूर्ण जगच आहे. 

ऐश्वर्या एक चांगली आई आहे. तिने आराध्याचे संगोपन परफेक्ट केले आहे. 

ऐश्वर्या आणि मी लवकरच एखाद्या चित्रपटात एकत्र काम करणार असल्याचे अभिषेकने म्हटले. 

अभिषेक याच्या या मुलाखतीनंतर ऐश्वर्या आणि तिच्यासंदर्भात सुरु असलेल्या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभिषेक याच्या वाढदिवसाच्या दिवशी ऐश्वर्याने अभिषेक याचा लहानपणाचा फोटो शेअर केला होता. त्यात प्रेमळ संदेश होता.