1 February 2024

मृत्यूनंतर अनेक वर्षांनी या सुपरस्टारच्या मौल्यवान वस्तूंचा होतोय लिलाव

Mahesh Pawar

चॉकलेट बॉय म्हणून बॉलीवूडमध्ये ओळखला जाणारा सुपरस्टार देवानंद याच्या चाहत्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे.

देवानंद यांच्या अनोख्या चित्रपटांच्या पोस्टर्स आणि चित्रांवर सर्वाधिक बोली लावली जाणार आहे.

2024 च्या सुरुवातीला हा ऑनलाइन लिलाव देवानंद यांच्या दुर्मिळ गोष्टींचा आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव असेल.

देव आनंद यांच्या चित्रपटामधील दुर्मिळ आणि जुने फोटो, पोस्टर्स, शोकार्ड्स, लॉबी कार्ड्स इत्यादींचा लिलाव होणार आहे. 

आराम, मिलाप, माया, मंझिल, कहीं और चल, बारिश, बात एक रात की, सरहद, किनारे किनारे इत्यादी त्यांच्या चित्रपटांच्या गाण्याच्या पुस्तिका यात आहेत.

हायलाइट्समध्ये ब्लॅक अँड व्हाइट फोटोग्राफिक स्टिल, हरे रामा हरे कृष्णा (1971) मधील पंधरा रंगीत फोटोग्राफिक स्थिरचित्रांचा समावेश आहे.

तसेच काही चित्रपटांचे अनोखे भारतीय कोलाज केलेले हस्तनिर्मित शोकार्ड यांचाही यात समावेश आहे.

बाजीचे प्रसिद्ध ब्लॅक अँड व्हाइट सिल्व्हर जिलेटिन छायाचित्र, संपूर्ण ब्लॅक मार्केट लॉबी कार्ड अशा काही संस्मरणीय वस्तूंचाही लिलाव होणार आहे.

हा ऑनलाइन लिलाव गुरुवार 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2024 संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल. लिलावाची नोंदणी २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स