जेव्हा या अभिनेत्रीला  तिच्या चाहत्याने रक्ताने  लिहिलं होतं पत्र. 

सोनाली बेंद्रे 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. करिअरमध्ये एकवेळ तिच्यामागे प्रचंड  फॅनफॉलोईंग होती. 

1994 मध्ये रिलीज झालेल्या आग चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक हिट  चित्रपटात काम केलं.

तिच्या बाबतीत असं म्हटलं  जात की, तिच्या एका चाहत्याने  तिला भेटता आलं नाही,  म्हणून जीवन संपवलं. 

मिड डे च्या 'द बॉम्बे फिल्म पॉडकास्ट'मध्ये जेव्हा सोनालीला या चाहत्याबद्दल समजलं, तेव्हा तिला धक्का बसला.

ही बातमी ऐकल्यानंतर ' हे खर आहे का?'  असं तिने विचारलेलं.  

काही फॅन्सनच्या रक्ताने लिहिलेल्या चिठ्ठया मिळाल्याच तिने सांगितलं. या चिठ्ठया खरच रक्ताने लिहिल्यात का? हे देखील तिने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.