बिग बॉस ओटीटी-1ची विनर ठरल्यानंतर दिव्या अग्रवाल अधिकच चर्चेत आली आहे.
बिग बॉस ओटीटीवर जिंकल्यानंतर ती चॅनेलवरील बिग बॉसच्या शोमध्ये येईल असं सांगितलं जात होतं.
पण तिला बिग बॉसमध्ये संधी मिळाली नाही, हा तिच्यासाठी धक्काच होता.
दिव्या अग्रवालने या सर्व प्रकारावर मौन सोडलं आहे.
बोलावणं आलं नसतानाही ती बिग बॉसच्या इव्हेंटमध्ये गेली होती.
या इव्हेंटच्यावेळी प्रेक्षक आपल्याला चिडवत होते, बिग बॉसमध्ये न घेतल्याबद्दल डिवचत होते.
माझी खिल्ली उडवली गेली, माझा अपमान केला, असं दिव्या म्हणते.
तिला बिग बॉस ओटीटी जिंकूनही पराभूत असल्यासारखं वाटत होतं.