करीना अन् सैफच्या घरी एका खास, छोट्याशा बाप्पाचं आगमन; जेहचा पूजा करतानाचा फोटो

27 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

देशभर गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे

अनेक कलाकारांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे

सैफ अली खान आणि करीना कपूर यांनीही बाप्पाचे त्यांच्या घरी स्वागत केले

करीनाने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा एका खास पोस्टद्वारे दिल्या

करीनाने मुलगा जेहचा बाप्पाच्या मूर्तीसोबतचा फोटो शेअर केला

इकोफ्रेंडली गणेशजी करीनाच्या घरी आले आहेत, ज्याची झलक तिने दाखवली आहे

पोस्ट शेअर करताना तिने लिहिले, 'मला आठवते, माझ्या लहानपणी, आरके कुटुंबाचा गणपती नेहमीच खास असायचा'

करीनाने पुढे लिहिले, "आता, माझी मुलेही त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. गणपती बाप्पा मोरया!"