2 october 2025
Created By: Atul Kamble
2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती साजरी होते.या त्यांच्या जीवनावर बेतलेले 6 चित्रपट जाणून घेऊया
'गांधी'हा चित्रपट साल 1982 मध्ये रिलीज झाला.बेन किंग्सले यांनी यात गांधी साकारले होते.यासाठी त्यांना उत्कृष्ठ अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.या चित्रपटाला 8 ऑस्कर मिळाले होते.
'सरदार'हा चित्रपट 1993 साली आला. त्यात अन्नू कपूर यांनी गांधी साकारले होते.हा चित्रपट सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित होता.
'द मेकिंग ऑफ महात्मा'1996 साली आला. यात रजत कपूर महात्मा गांधी बनले होते.ही कहाणी साऊथ आफ्रीकेतील गांधीच्या लढ्याबद्दल होती
'हे राम' साल 2000मध्ये प्रदर्शित झाला होता.यात नसीरुद्दीन शाह यांनी महात्मा गांधी यांचे कॅरेक्टर केले होते.
'लगे रहो मुन्नाभाई'2006 मध्ये आला. यात दिलीप प्रभावलकर यांनी गांधींचे काल्पनिक पात्र साकारले.जे संजय दत्त याला अहिंसेचे तत्व शिकवतात
'गांधी माय फादर'त्यांच्या खाजगी नात्यांवर आधारित होता. यात गांधी यांचे त्यांच्या मुलाशी असलेले गुंतागुंती नाते चितारण्यात आले होते.यात दर्शन जरीवाला यांनी गांधीची भूमिका केलीय.