हेमा मालिनी “दिल आशना है” या चित्रपटाची निर्मिती करत होती.
1988 मध्ये फौजी मालिकेत काम करणाऱ्या शाहरुख खानला त्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलवले होते.
शाहरुख खान तोपर्यंत केवळ दूरचित्रवाणी मालिकेतच काम करत होता.
पहिल्यांदा ऑडिशन घेतली तेव्हा शाहरुख खान घाबरलेला होता. यामुळे हेमा मालिनीने त्याला रिजेक्ट केले.
शाहरुख खानला हेमा मालिनीने पुन्हा ऑडिशन देण्याचा सल्ला दिला.
दुसऱ्या ऑडिशनमध्ये शाहरुख खान यशस्वी झाला. त्यानंतर धर्मेंद्रला शाहरुखला भेटण्यासाठी बोलवले.
1992 मध्ये रिलीज झालेली ‘दीवाना’ हा शाहरुख खानचा पहिला चित्रपट आहे.
‘दीवाना’ हा चित्रपट “दिल आशना है” चित्रपटापूर्वी रिलीज झाला.