जान्हवी कपूर हीने तिरुपतीच्या 3,550 पायऱ्या चढल्या, असा साजरा केला वाढदिवस

Created By: Atul Kamble

10 March 2026

अभिनेत्री जान्हवी कपूर हीने तिचा 29 वा वाढदिवस आध्यात्मिक रितीने साजरा केला. तिने तिच्या जन्मदिवसाची सुरुवात आंध्रातील प्रसिद्ध तिरुमाला वेंकटेश्वर मंदिर दर्शनाने केली. 

आपल्या मित्रपरिवारासह जान्हवी हिने तिरुपती मंदिरात प्रार्थना केली आणि भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले आणि चांगले आयुष्य मिळण्यासाठी प्रार्थना केली.

जान्हवी जवळपास दरवर्षी तिरुपतीला भेट देते. भगवान बालाजीच्या प्रति आपली श्रद्धा व्यक्त करते.

छैया छैया  चित्रपट : दिल से - वर्ष :1998

विशेष म्हणजे तिने अनवाणी तब्बल 3,550 पायऱ्या चढून बालाजीचे दर्शन घेतले. जान्हवीने संपूर्ण श्रद्धेने मित्र परिवारासोबत ही आध्यात्मिक यात्रा पूर्ण केली.

 मंदिर दर्शन करताना जान्हवी अत्यंत साध्या पेहरावात आली होती. तिचा लूक अत्यंत शांत आणि लोभसवाणा वाटत होता.

 यावेळी जान्हवी हीची खास मैत्रिण तनिषा संतोषी देखील तिच्यासोबत होती. दोघींनी मंदिर परिसरात फोटो देखील काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले.

 मंदिरात पूजा करताना जान्हवीच्या लूकने सर्वांना आकर्षित केले. तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. त्यावर सोनेरी डिझाईन असलेला गुलाबी ब्लाऊज घातला होता

या साडी सोबत जान्हवीने साधे दागिने घातले होते. केसांची स्टाईलही साधी होती. तिचा हा साधा लूक खूपच ग्रेसफुल आणि एलिगेंट वाटत होता.

जान्हवीने तिच्या बड्डेच्या केकचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या केकवर 'HBD Ladoo' असे लिहिले होते.

जन्मदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये जान्हवीचा एक मजेदार फोटोही पाहायला मिळाला. त्यात बर्थडे हॅट घातलेला गंमतीदार फोटोही शेअर केला आहे.