सैयाराने अजय-आमीरला टाकले मागे, ‘छावा’चा विक्रम मोडायला निघाला

25 July 2025

Created By: Atul Kamble

अहान पांडेचा चित्रपट सैयारा लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. 

अहान आणि अनीत या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री जुळून आली असून बॉक्स ऑफीसवर चित्रपट तगडी कमाई करीत आहे

अहान पांडे याचा हा चित्रपट अधिकृत ब्लॉकब्लास्टर सिद्ध झाला आहे. आणि अनेक रेकॉर्ड ही तोडत आहे

मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात स्थान मिळवले आहे

सैयारा या चित्रपटाने आतापर्यंत १८५ कोटींची कमाईचा आकडा पार केला आहे

 यावर्षीचा आमीरचा सितारे जमीन पर ( १६६ कोटी ) आणि अजयचा रेड-२ ( १७३.०५ कोटी) यांना सैयाराने कधीच मागे टाकले

आठव्या दिवशी सैयाराने हाऊसफुल-५ ला मागे टाकत यावर्षीचा सर्वाधिक कमाईच्या चित्रपटात दुसरे स्थान मिळवले

 या वर्षी सर्वाधिक कमाई छावा चित्रपटाने केली असून ( ६०१.५४ कोटी ) सैयारा दुसऱ्या क्रमांकावर आहे