अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका आलाय
15 December 2023
Created By: Chetan Patil
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला दिग्गज अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका आलाय
श्रेयस दिवसभर 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता.
श्रेयस गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाचं चित्रीकरण आटोपून घरी गेला होता
या दरम्यान त्याला घरी अस्वस्थ वाटू लागलं. श्रेयसच्या पत्नीने त्याला तातडीने रुग्णालयात नेलं
श्रेयसवर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्यात आलीय.
अमर उजालाचे पत्रकार पंकज शुक्ला यांनी ट्विटरवर श्रेयसच्या प्रकृतीविषयी ट्विट केलंय. श्रेयसची तब्येत आता बरी असल्याची माहिती पंकज शुकला यांनी ट्विटरवर दिली आहे.
श्रेयसची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांकडून देवाकडे प्रार्थना केली जात आहे.