1 February 2024

मोठ्या पडद्यावरील हे स्टार कलाकार आहेत बालपणापासूनचे मित्र!

Mahesh Pawar

बॉलिवूडमधील अनेक कलाकार चित्रपटासोबतच त्यांच्यातील मैत्रीमुळेसुद्धा चर्चेत असतात. त्यातील काही कलाकारांची दोस्ती बालपणापासून म्हणजेच शाळेपासून आहे.

त्यांची मैत्री बालपणापासून ते आत्तापर्यंत चांगली घट्ट आहे. अशाच काही बॉलिवूड कलाकारांची माहिती देत आहोत ज्यांनी बालपणी एकत्र शिक्षण घेतले होते.

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफला या दोघांची मैत्री आजची नाही तर ती अनेक वर्षापूर्वीची आहे. श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ मुंबईतील एका शाळेत शिकले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली यांची पत्नी अनुष्का शर्मा आणि माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी या एकत्र शिकल्या आहेत.

करण जोहर आणि ट्विंकल खन्ना हे दोघे लहानपणी एकत्र शिकले आहेत. ट्विंकल खन्नाने तिच्या ऑटोबायोग्राफीमध्ये याचा उल्लेख केला आहे.

सलमान खान आणि आमीर खानने 'अंदाज अपना अपना'मध्ये एकत्र काम केले आहे. लहानपणी हे दोघे एकत्र शिकले आहेत हे खूप कमी लोकांना माहित आहे.

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ या दोघी बालपणी एकत्र शिकल्या आहेत.

वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांची मैत्री सुद्धा खूप जुनी आहे. हे दोघे बालपणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकले आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स