दुधीत 90 टक्के पाणी असते म्हणूनच ते खाल्ल्याने पचनक्रिया जलद होण्यास मदत होते.

दुधीची प्रकृती थंड असल्यामुळे ती पोट आणि शरीरासाठी चांगली भाजी मानली जाते.

दुधीत फायबर आणि रफगेज देखील चांगले असते जे तुमचे वजन संतुलित ठेवण्यासाठी मदत करते.

दुधीत असलेले फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

युरिक ॲसिड वाढले असेल अशा लोकांनी दुधीचे सेवन करावे.

दुधीमुळे मधुमेहातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

पित्त कमी करण्यासाठी देखील दुधीचे सेवन खूप फायदेशीर आहे.

पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवून पीएच संतुलित करण्यास दुधी मदत करते.