बबली गर्लचा ‘गुलाबी’ अवतार

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने नेहमीच चाहत्यांना वेड लावते. तिची प्रत्येक शैली चाहत्यांच्या मनाला भिडते. ती दररोज स्वतःचे नवनवे फोटो शेअर करत असते.

अनन्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. यावेळी तिने बेबी पिंक कलरच्या गाऊनमधील फोटो  शेअर केले आहेत.

अनन्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. चाहते तिला ‘परी’ म्हणत आहेत. फोटोंमध्ये अनन्याने ऑफ शोल्डर बेबी पिंक कलरचा  गाऊन घातला आहे.

हे फोटो शेअर करताना अनन्याने लिहिले की, मला माहित आहे की सर्वजण आता कतरिना आणि विकीच्या लग्नाचे फोटो पाहत आहेत (मी पण) हाय…

5 लाखांहून अधिक चाहत्यांनी अनन्याचे फोटो लाईक केले आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘एवढ्या सुंदर चेहऱ्यावर ही चमक  कुठून येते...’