17 फेब्रुवारी 2025
नाव बदलताच 120 रुपयांच्या बिअरचं झालं नुकसान, एका वर्षात विक्रीत घट
बीरा बिअरचे मालक बी9 बेवरेजला आर्थिक वर्षा 2024 मध्ये मोठं नुकसान झालं. विक्रीत 20 टक्क्यांनी घट झाली.
विक्रीत घट ही नियामक बदल आणि नाव बदलल्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. नाव बदलल्याने कोट्यवधि रुपयांचं नुकसान झालं.
नाव बदलल्याने एका वर्षात कंपनीचा तोटा 68 टक्क्यांनी वाढला. कंपनीने नवीन उत्पादन लेबल नोंदणीसाठी पुरवठा थांबवला. त्याचा विक्रीवर परिणाम झाला.
2026 मध्ये आयपीओ लाँच करण्यापूर्वी कंपनीने नाव बी9 बेवरेजेज प्रायव्हेट लिमिटेड बदलून बी9 बेवरेज लिमिटेड केलं.
या सर्व प्रोसेसमध्ये 80 कोटी रुपयांची विक्री थांबवली आणि त्यामुळे तोटा 68 टक्क्यांनी वाढला.
वाढती स्पर्धा आणि इतर ब्रँडमुळे अधिक नुकसान झाल्याचंही चर्चा रंगली आहे.
मार्च 2024 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात बी9 बेवरेजेजचं 748 कोटींचा तोटा झाला.