PF खात्यातील रक्कमेवर मिळू शकतो जास्त व्याज, जाणून घ्या
5 फेब्रुवारी 2025
पीएफधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते
ईपीएफओ पीएफवर व्याज देण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते
ईपीएफओकडून पीएफच्या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता
सध्या ईपीएफओकडून जमा रक्कमेवर 8.25 टक्के व्याज दिला जातो, आता हा व्याजदर वाढेल, अशी कर्मचाऱ्यांना आशा
रिपोट्सनुसार, पीएफच्या व्याजदरात वाढ होऊ शकते, ईपीएफओच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो
ईपीएफओची 28 फेब्रुवारीला बैठक होणार आहे, या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष
2023-24 वर्षासाठी 8.25 टक्के इतका व्याजदर होता, तर 2022-23 मध्ये 8.15 इतका होता