17 फेब्रुवारी 2025

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट पडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही

शेअर बाजारातील सततच्या घसरणीमुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ एक मोठा निर्णय घेऊ शकते.

सरकार ईपीएफ खात्यात जमा होणाऱ्या रकमेवरील व्याजासाठी एक नवीन योजना आखत आहे. ईपीएफओ ग्राहकांना दरवर्षी समान व्याज मिळावा यासाठी प्रयत्न असणार आहेत. 

सरकार गुंतवणुकीतून ईपीएफओला मिळणाऱ्या उत्पन्नापासून वेगळं ठेवण्याची शक्यता आहे. यासाठी सरकार लवकरच नवीन निधीसाठी तरतूद करण्याची शक्यता आहे.

दरवर्षी व्याजातून वाचवलेले अतिरिक्त पैसे या निधीत जमा केले जातील. जर मार्केट पडलं की ईपीएफला कमी नफा मिळाला तर... 

तेव्हा या फंडातून पैसे काढून ईपीएफओ ग्राहकांना व्याज दिलं जाईल. यामुळे त्यांना कायम निश्चित व्याज मिळत राहील. 

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने यासाठी अभ्यास सुरु केला आहे. संशोधन करून निधी कसं काम करेल आणि त्यात किती पैसे ठेवले जातील याबाबत ठरवलं जाईल. 

या धोरणामुळे ईपीएफओ ग्राहकांना शेअर बाजारातील चढउताराचा काही फटका बसणार नाही. तसेच समान व्याज मिळेल. 

ईपीएफओ या योजनेसाठी सुरुवातीच्या टप्प्यावर काम करत आहे. या वर्षाच्या अखेरीस यावर वेगाने काम होईल.