गुंतवणूकदारांना करुन गेला कंगाल; हा शेअर तरी कोणता? 

7 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

Mishtann Foods च्या शेअरमध्ये शुक्रवारी मोठी घसरण 

सेबीने या कंपनीवर कडक कारवाई केल्याने शेअर 20 टक्के आपटला

हा शेअर शुक्रवारी 12.42 रुपयांच्या निच्चांकावर बंद झाला 

या कंपनीवर बाजारातून पैसा जमा करण्यावर सात वर्षांसाठी बंदी घातली 

आर्थिक अनियमितता आणि आर्थिक गडबडींमुळे SEBI चे प्रतिबंध

प्रमोटर्सच्या माध्यमातून 100 कोटींचा आर्थिक घोटाळ्याचा ठपका 

एक वर्षापूर्वी हा शेअर 26 रुपयांच्या उच्चांकावर होता