4 February 2024

महिलांना सर्वाधिक नफा मिळवून देणारा हा आहे जबरदस्त व्यवसाय 

Mahesh Pawar

चूल आणि मुल यात न अडकता अनेक महिला आता स्वतंत्र व्यवसायात उतरल्या आहेत.

अनेक महिला छोटे छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहेत.

ब्युटीपार्लर, खाद्य पदार्थ, वर्षभर साठवले जाणारे मसाले, आर्डरप्रमाणे जेवण असे अनेक छोटे व्यवसाय आहेत.

शाळा, कॉलेजजवळ स्टेशनरी, झेरॉक्स, स्वच्छ आणि चवदार नास्ता, जेवण असेही काही व्यवसाय आहेत.

त्याचप्रमाणे लहान मुलांना सांभाळणे हे अवघड आहे. प्रेमाने संस्कार करणाऱ्या यशोदा माता आज हव्यात.

अनेक महिला नोकरी करत असल्याने त्यांना यशोदा मातांची गरज भासते.

अशा नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी बालसंगोपन केंद्र 'आपलं घर' याची सुरुवात करा. 

अगदी एका मुलापासून हे काम करू शकता.

घरच्या घरी लॉंड्रीचे काम, विवाह प्रसंगी लागणारे रुखवत वस्तू असे व्यवसाय आहेत जे घरी राहून करू शकता.

असे बरेच व्यवसाय आहेत जे चांगले आणि उत्तम अर्थार्जन करून देतात. त्यासाठी फक्त आवड आणि वेळ हवा.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स