05 August 2025
Created By: Atul Kamble
जग्वार लँड रोव्हरने पी.बी.बालाजी यांना आपले सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे प्रसिद्ध ब्रिटीश ब्रँडचे सर्वोच्च पदावर जाणारे ते पहिले भारतीय बनले आहेत.
बालाजी, एड्रीयन मार्डेल यांची जागा घेतील. एड्रीयन मार्डेल तीन वर्षे सीईओ आणि ३५ वर्षे काम केल्यानंतर निवृत्तीची इच्छा व्यक्त केली आहे
टाटा समुहाचे मुख्य वित्तीय अधिकारी रुपात काम केल्यानंतर बालाजी नोव्हेंबरपासून JLRचे CEO पद सांभाळणार आहेत
बालाजी यांनी आयआयटी चेन्नईत मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आणि IIM कोलकातातून व्यवस्थापनात डिप्लोमा (PGDM) केला
बालाजी नोव्हेंबर २०१७ पासून टाटा मोटर्स समुहाचे ग्रुप CFO आहेत. आणि ऑटोमोबाईल आणि ग्राहक साहित्य उद्योग, वित्त आणि पुरवठा साखळी क्षेत्रात ३२ वर्षांचा अनुभव आहे.
बालाजी यांनी १९९५ मध्ये युनिलिव्हरमधून करियरची सुरुवात केले. भारत,सिंगापूर,ब्रिटन आणि स्वित्झर्लंड येथे कॉर्पोरेशट फायनान्स आणि सप्लाय चेनमध्ये वरिष्ठ पदावर काम केले
टाटा मोटर्स आधी बालाजी हे हिंदूस्थान युनिलिव्हर लि.चे CFO होते. त्यांनी भारत,सिंगापूर,ब्रिटन आणि स्वित्झर्लंड येथे जागतिक टीमचे नेतृत्व केले