घर भाड्याने दिलं असेल तर या गोष्टी माहित पाहिजेच, नाय तर नुकसान झालंच समजा! 

12  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

वार्षिक भाडं 1 लाखापेक्षा अधिक असल्यास भाडेकरु एचआरए क्लेम करण्यासाठी पॅन कार्ड नक्की मागेल. तुम्ही उत्पन्नात भाड्याच्या रक्कमेचा उल्लेख केला नाहीत तर अडचण होऊ शकते.

मासिक भाडं 50 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल, तर भाडेकरुला 5 टक्के टीडीएस कट करावा लागतो. हे फॉर्म 26AS मध्ये पाहता येतं. हे उत्पन्न आयटीआरमध्ये  दाखवलं नाही तर नोटीस येऊ शकते.

रोख रक्कमेत मोठा व्यवहार केल्यास आयटीच्या रडारवर येऊ शकता. त्यामुळे कायम व्यवहार चेक, बँक ट्रान्सफर किंवा यूपीआयद्वारे करा, जेणेकरुन नोंद राहिल.

कमी भाडं दाखवून स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर मोठी चूक करताय. भाडेकरुकडून जमा केल्या जाणाऱ्या पावत्या आणि करारात तफावत होईल. त्यामुळे अडचण होऊ शकते.

अनेकदा डिपॉझिट रक्कमेबाबत कोणताही रेकॉर्ड ठेवला जात नाही. त्यामुळे भविष्यात वाद होऊ शकतो. त्यामुळे  व्यवहारात प्रत्येक गोष्टीचा पुरावा ठेवावा. 

भाडेकरुच्या पॅन कार्ड व्यतिरिक्त, आधार कार्ड, संबंधित कागदपत्रं, नोकरीबाबत आणि आवश्यक माहिती जाणून घ्या. 

तसेच दरवर्षी करारनामा (एग्रीमेंट)  करा. दरवर्षी एग्रीमेंट केल्याने संभाव्य फसवणुकीला वावच राहणार नाही.  त्यामुळे काही पाचशे-हजार रुपये वाचवण्यसाठी मोठी जोखीम पत्कारु नका.

आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनने केली मोठी घोषणा