देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लग्नाचा 40 वा वाढदिवस नुकताच झाला.
18 March 2025
अंबानी दाम्पत्याचा 40 वर्षांच्या प्रवासाचे जोरदार सेलिब्रेशन झाले. या खास इव्हेंटवर अंबानी फॅमिलीने पार्टी ठेवली होती. त्यासाठी स्पेशल केक मागवला गेला.
विशेष थीम असणारा हा केक मुंबईतील एका पेस्ट्री शॉपने तयार केला होता. मुंबईत हाय-एंड बेकरी चालवणारी बंटी महाजनने इंस्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अंबानी दाम्पत्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वनतारा थीम वाला गोल्ड आणि पिंक टियर केक बनवला.
सहा टियर केकचा सोनेरी रंग आहे. त्यावर वेगवेगळ्या प्राण्याची प्रतिकृती तयार केल्या आहे. केकच्या वरती गोल्ड लीव्स आणि हत्ती आहे.
हत्तींनी एक साइन पकडला आहे. त्यावर लिहिले आहे "हॅप्पी एनिव्हर्सरी, डिअर नीता आणि मुकेश". केकच्या मध्ये नीता आणि मुकेश यांच्या नावाचे पहिले अक्षर "N" अन् "M" लिहिले आहे.
केकचे काही लेयरवर सोनेरी रंगाच्या झेब्रा आणि वाघाच्या पट्ट्यांनी सजवले होते. ते सोनेरी गवताने वेढलेले होते, त्यामध्ये सिंह, जिराफ आणि मगरीच्या प्रतिकृती आहेत.
व्हिडिओमध्ये महाजन यांनी सांगितले की, या केकचे वजन 30 किलोपेक्षा जास्त आहे आणि त्यांना रिलायन्सच्या वंतरा यांच्यापासून प्रेरणा घेऊन केक बनवण्यास सांगितले होते.
केक पाहून अंबानी कुटुंबानेही महाजन यांचे कौतुक केले. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा विवाह ८ मार्च १९८५ रोजी झाला होता.