झिरो रिस्क आणि फायद्याची हमी! पोस्टाची जबरदस्त स्कीम, जाणून घ्या

12  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडी योजनेत दरमहा ठराविक रक्कम जमा करुन फंड तयार करता येतो. ही योजना पोस्ट ऑफीसद्वारे चालवली जाते. पोस्टात गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित असते.

या योजनेत किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. तसेच कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. जो तो त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार पैसे गुंतवू शकतो.

पोस्ट ऑफीसच्या आरडी स्कीममध्ये सरकार हमी देतं. त्यामुळे या योजनेत रिस्क फॅक्टर नावाचा प्रकारच नाही. ही योजना भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगली आहे.

उदाहरणार्थ, दरमहा 5 वर्षांसाठी दरमहा  5 हजार रुपये जमा केल्यास एकूण 3 लाखांचा फंड तयार होतो. गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीनंतर एकूण 3 लाख 56 हजार 830 रुपये मिळतील. 

या योजेनत 6.7 वार्षिक व्याज दिला जातो. तसेच चक्रवाढ व्याज सुद्धा दिला जातो. व्याजाच्या पैशावरही व्याज मिळतो. 

अपत्याच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करु शकता. गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफीसची ही स्कीम सर्वोत्तम आहे.

Tv9 मराठी कोणत्याच गुतंवणुकीचा सल्ला देत नाही तसेच कुठलाही दावा करत नाही. गुंतवणुकीआधी तज्ज्ञानांचा सल्ला जरुर घ्या.

आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनने केली मोठी घोषणा