ही पोस्ट ऑफिस योजना आहे अत्यंत फायदेशीर; मिळेल इतके व्याज

27 नोव्हेंबर 2025

Created By: Mayuri Sarjerao

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम (SCSS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासार्ह गुंतवणूक योजना

60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती त्यात गुंतवणूक करू शकतात.

या योजनेअंतर्गत गुंतवणूक किमान 1000 ते कमाल 30 लाखांपर्यंत असू शकते.

2025 ते 26 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी व्याजदर 8.2% आहे.

यात गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते

दर तिमाहीत गुंतवणूकदाराच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाते. हे पैसे ताबडतोब वापरले जाऊ शकतात

या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे, जो इच्छित असल्यास आणखी 3 वर्षांनी वाढवता येतो.

कोणत्याही कारणास्तव मुदतपूर्व पैसे काढणे आवश्यक असल्यास, दंड देखील लागू आहे

एका वर्षापूर्वी पैसे काढल्यास कोणतेही व्याज आकारले जात नाही.

1 ते 2 वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास 1.5 % वजावट आणि 2 ते 5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास 1% वजावट दिली जाते

पती-पत्नी संयुक्त खाते देखील उघडू शकतात