Created By: Atul Kamble

१० वर्षांपासून बँकेचे खाते बंद आहे, तरीही काढू शकता तुमचे पैसे ? कसे ते पहा..

Created By: Atul Kamble

30 May 2026

जर तुमचे एखादे बँक खाते दहा वर्षांपासून वापरात नाही ? तुमचे पैसे सरकारचे नाहीत ते अजूनही तुमचेच आहेत असे रिझर्व्ह बँक म्हणते.यय ते पैसे तुम्ही आजही काढू शकता.

नोकरी बदलणे, शहर बदलणे वा बँक खाते विसरणे यामुळे जुने खाते वापरणे तुम्ही  बंद केले असेल.आरबीआयच्या नुसार सतत दोन वर्षे तुम्ही कोणतेही ट्राक्झंशन केले नाही तर ते खाते इनऑपरेटिव्ह अकाऊंट म्हटले जाते.

जर १० वर्षे बँक खात्यात कोणतीही देवाण-घेवाण झाली नाही तर ते पैसे आरबीआयच्या DEAF फंडमध्ये पाठवले जाते. याचा अर्थ Depositer Education and Awareness Fund असा आहे.यात देशभरातील अनक्लेम्ड पैसे जमा असता.है पैसे बँकेचे किंवा सरकारचे नसतात.त्या पैशांवर खातेधारक वा त्याच्या वारसदाराचा हक्क असतो.

आरबीआयने लोकांच्या सुविधेसाठी UDGAM पोर्टल देखील सुरु केले आहे. या पोर्टलवर जाऊन तुम्ही विसरलेले बँक खाते आणि अनक्लेम्ड रकमेची माहिती घेऊ शकता. यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर बँकेचे नाव, अकाऊंट संबंधी माहिती आणि इतर माहिती भरावी  लागेल.

जर पोर्टलवर तुम्हाला तुमचे अकाऊंट दिसले तर तुम्ही ज्या शाखेत खाते उघडले तेथे तुम्हाला जावे लागेल. तेथे पुन्हा अकाऊंट सुरु करण्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुमचे खाते सक्रीय होईल. तुमच्याकडे KYC डिटेल्स मागितली जाऊ शकते. त्यानंतर बँक अकाऊंट पुन्हा सुरु करेल.

खाते धारकाचा मृत्यू झाला असेल तर नॉमिनीला वा कुटुंबाला डेथे सर्टीफिकेट्स, सक्सेशन सर्टीफिकीट वा इतर कागदपत्रे द्यावी लागतात.तपास पूर्ण झाल्यानंतर हे खाते सुरु होते. किंवा ही रक्कम कोणा दुसऱ्या एक्टीव्ह खात्यात ट्रान्सफर केली जाऊ शकते. काही प्रकरणात व्याजही मिळते.

आरबीआय म्हणते लोकांनी दीर्घकाळ बँक खाते विनावापर ठेवू नये.वेळोवेळी देवाण-घेवाण केल्याने खाते सक्रीय राहाते.त्यामुळे  कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही.

अनेकांना वाटते अशा डॉर्मेंट खात्यांचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. मात्र, असे अजिबात नाही. विना पासबुक पैसे मिळू शकतात का ? जर तुमच्याकडे योग्य ओळख आणि खात्याशी संबंधित इतर पुरावे असतील तर बँक मदत करु शकते.