आहारातील कॅल्शियम सप्लीमेंट

शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

तीळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. एक टेबलस्पून तिळात सुमारे 88 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. सूप, तृणधान्ये किंवा सॅलडमध्ये तीळ घालून त्याचा वापर करता येतो. हिवाळ्यात तिळाचे लाडूदेखील फायदेशीर असतात.

तीळ

आवळ्यातदेखील भरपूर कॅल्शिअम असते. याशिवाय आवळ्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आवळा ज्यूस किंवा पावडरच्या स्वरूपातही खाऊ शकता.

आवळा

जिरे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जिरे खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्ही 1 ग्लास पाणी उकळा त्यात 1 टीस्पून जिरे घाला. पाणी थंड करून दिवसातून किमान दोनदा प्या.

जिरे

नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॅल्शियमसाठी नाचणीचा आहारात समावेश करावा. नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. खीर किंवा भाकरी बनवून खाऊ शकता.

नाचणी