तुम्ही कसा टूथब्रश वापरता यावर तुमच्या दातांची स्वच्छता अवलंबून असते.
दात स्वच्छ आणि चमकदार हवे असतील तर योग्य, चांगला टूथब्रश वापरणे महत्वाचे ठरते.
खराब टूथब्रश वापरल्याने दातांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
काही लोकं वर्षानुवर्ष एकच टूथब्रश वापरत राहतात.
मात्र बऱ्याच काळापर्यंत एकच टूथब्रश वापरल्याने किटाणूंचा त्रास वाढतो. दात नीट स्वच्छ होत नाहीत.
तुम्ही तुमचा टूथब्रश कमीत कमी 2 ते 3 महिन्यांनी बदलला पाहिजे.
दात स्वच्छ ठेवण्यासाठी सॉफ्ट ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरणे योग्य ठरते.
प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी ब्रश केले पाहिजे. तसेच काहीही खाल्ल्यावर 3 ते 4 वेळा खळखळून चूळ भरली पाहिजे.
दातांचे चांगले आरोग्य आपल्याच हातात असते.