पवित्रश्रावण  मास

महत्त्व आणि उपासना

पवित्रश्रावण  मास

महत्त्व आणि उपासना

हिंदू पंचांग आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण हा वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरुन या महिन्याला श्रावण असे नाव देण्यात आले आहे. श्रावण महिना शिवभक्तांसाठी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पर्वणी आहे.

पवित्रश्रावण  मास

महत्त्व आणि उपासना

श्रावण मास महादेवाला अत्यंत प्रिय असून हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातच कावड यात्रा निघते. श्रावण महिन्यातील सोमवारचेही विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातला सोमवार हा दिवस मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो.

पवित्रश्रावण  मास

महत्त्व आणि उपासना

श्रावण सोमवारी उपवास ठेवून महादेवाची मनोभावे पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि महादेव आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात, असा विश्वास भक्तांना आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात, अशी मान्यता आहे.

पवित्रश्रावण  मास

महत्त्व आणि उपासना

श्रावणातील सोमवारी शंकराची उपासना करतात. दर श्रावण सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहण्याची परंपरा आहे. मूठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एकेक सोमवारी शिवाला वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात.

पवित्रश्रावण  मास

महत्त्व आणि उपासना

पहिला श्रावण सोमवार

9 ऑगस्ट 2021

पवित्रश्रावण  मास

महत्त्व आणि उपासना

दुसरा श्रावण सोमवार

16 ऑगस्ट 2021

पवित्रश्रावण  मास

महत्त्व आणि उपासना

तिसरा श्रावण सोमवार

23 ऑगस्ट 2021

पवित्रश्रावण  मास

महत्त्व आणि उपासना

चौथा श्रावण सोमवार

30 ऑगस्ट 2021

पवित्रश्रावण  मास

महत्त्व आणि उपासना

पाचवा श्रावण सोमवार

06 सप्टेंबर 2021