विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारे 10 गोलंदाज
8 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
न्यूझीलंडच्या टीम साउदीने विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद केलं आहे. त्याने 11 वेळा विकेट काढली आहे.
इंग्लंडच्या मोईन अलीने विराट कोहलीला तिन्ही फॉर्मेटमध्ये 10 वेळा बाद केलं आहे.
जेम्स अँडरसन आणि विराट कोहलीचं द्वंद्व सर्वश्रूत आहे. त्याने विराटला 10 वेळा बाद केलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या हेझलवूडने विराटला 9 वेळा बाद केलं आहे.
दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने कोहलीला 9 वेळा बाद केलं आहे.
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद आणि स्टोक्सने विराटला 9 वेळा बाद केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स आणि एडम झाम्पाने 8 वेळा बाद केलं आहे.
दक्षिण अफ्रिकेच्या मोर्ने मॉर्केलने विराट कोहलीला 8 वेळा बाद केलं.
इंग्लंडच्या फिरकीपटू ग्रॅमी स्वाननेही विराटला 8 वेळा बाद केलं आहे.