15 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान याने आशिया कप 2025 स्पर्धेतील सामन्यात बुमराहच्या बॉलिंगवर 2 सिक्स लगावले.
साहिबजादा व्यतिरिक्त आणखी 4 फलंदाजांनी बुमराहला एका सामन्यात 2 षटकार लगावले आहेत.
झिंबाब्वेच्या एल्टन चिकुंबरा आणि विंडीजच्या लेंडल सिमन्स या दोघांनी 2016 साली बुमराहला 2-2 षटकार लगावले होते.
न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टील याने बुमराहच्या बॉलिंगवर एकाच सामन्यात 2 षटकार लगावले आहेत. मार्टिनने 2020 मध्ये ही कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याने 2022 साली बुमराहच्या बॉलिंगवर 2 सिक्स मारले होते.
मात्र बुमराहला आतापर्यंत एकाही फलंदाजाला एकाच टी 20I सामन्यात 2 पेक्षा अधिक सिक्स लगावता आलेले नाहीत.
बुमराहने आतापर्यंत टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण 9 विकेट्स मिळवल्या आहेत.