19 मार्च 2025
आयपीएलमध्ये या खेळाडूने 9 संघांकडून कमावले 24 कोटी रुपये!
आयपीएलचं 18वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत सर्वात जास्त फ्रेंचायझीकडून खेळणाऱ्या खेळाडूंबाबत जाणून घेऊयात..
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरॉन फिंच आयपीएलमध्ये सर्वात जास्त फ्रेंचायझीकडून खेळला आहे.
एरॉन फिंच आयपीएलच्या 9 संघांकडून खेळला आहे. फिंच 2010 ते 2022 या कालावधीत लीग स्पर्धेत खेळला आहे.
फिंच राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, पुणे वॉरियर्स इंडिया, सनरायझर्स हैदराबादसाठी खेळला आहे.
मुंबई इंडियन्स, गुजरात लायंस, पंजाब किंग्स, आरसीबी आणि कोलकाता नाइट रायडर्स संघातही खेळला आहे.
आयपीएलमध्ये एरॉन फिंचने 24 कोटी 50 लाखांहून अधिक पैसे कमावले.
एरॉन फिंचला सर्वाधिक पैसा हा पंजाब किंग्सकडून मिळाला. त्याला 2018 मध्ये 6 कोटी 20 लाख रुपये मिळाले होते.
एरॉन फिंचने आयपीएलच्या 92 सामन्यात 24.89 च्या सरासरीने 2091 धावा केल्या. यात 15 अर्धशतकांचा समावेश आहे.