रियान परागची आशिया कपआधी उपकर्णधारपदी नियुक्ती, कॅप्टन कोण?

18 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

दुलीप ट्रॉफी स्पर्धेआधी इस्ट झोन टीममध्ये 2 बदल करण्यात आलेत. ईशान किशन पहिल्या सामन्याचा भाग नसेल. तर आकाश दीप याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

Pic Credit : PTI

ईशान-आकाश बाहेर झाल्यामुळे इस्ट झोन टीममध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. ईशानच्या जागी अभिमन्यून इश्वरनची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

Pic Credit : PTI

अभिमन्यू आधी उपकर्णधार होता. मात्र आता तो नेतृत्व करणार आहे. त्यामुळे आता रियान पराग उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

Pic Credit :PTI

रियान व्यतिरिक्त या टीममध्ये मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार या भारतीय संघातील खेळाडूंचा समावेश आहे.

Pic Credit : PTI

रियानसाठी ही मोठी संधी आहे. रियानने याआधी आयपीएल 2025 मध्ये संजू सॅमसन याच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं आहे. 

Pic Credit : PTI

ईस्ट झोन या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात  28 ऑगस्टला क्वार्टर फायनल मॅचने करणार आहे. 

Pic Credit : PTI

ईस्ट झोनसमोर या सामन्यात शुबमन गिल याच्या नेतृत्वातील नॉर्थ झोनचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Pic Credit : PTI

अनाया बांगर दिसणार नव्या भूमिकेत, अखेर घेतला मोठा निर्णय