विराटला 14 वर्षांत जमलं नाही ते अभिषेकने 12 डावात करुन दाखवलं

22  जानेवारी 2025

अभिषेक शर्माची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी  20i सामन्यात स्फोटक अर्धशतकी खेळी

अभिषेकने 34 चेंडूत 232.35 च्या स्ट्राईक रेटने 79 धावा केल्या, या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश

अभिषेकने 20 चेंडूत 255 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं, अभिषेकने तिसऱ्यांदा 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने अर्धशतक केलं

अभिषेकने 200+ च्या स्ट्राईक रेटसह सर्वाधिक 50+ धावा करण्याबाबत विराटला पछाडलं

विराटने 14 वर्षांच्या टी 20i कारकीर्दीत फक्त 2 वेळाच 200+ च्या स्ट्राईक रेटने 50+ धावा केल्या

अभिषेकने  टी 20i करियरमधील 12 डावांतच तिसऱ्यांदा कारनामा केला

अभिषेकने टी 20i कारकीर्दीत आतापर्यंत 2 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं आहे