26 सप्टेंबर 2025
Created By: राकेश ठाकुर
श्रीलंकेविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात अभिषेक शर्माने 22 चेंडूत अर्धशतक झळकावले आणि 61 धावांची शानदार खेळी केली.
या खेळीसह, अभिषेक शर्मा आशिया कप 2025 मध्ये 300 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाजही ठरला.
आशिया कपमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांमध्ये अभिषेक शर्माने एकूण 309 धावा केल्या आहेत. यासह अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला.
श्रीलंकेविरुद्धच्या त्याच्या 61 धावांच्या खेळीसह अभिषेक शर्माने आरोन फिंच, बाबर आझम आणि महेला जयवर्धने यांचा विक्रम मोडला.
टी20 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला. पण विराट कोहली अजूनही अव्वल स्थानावर आहे.
एका टी20 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टी20 वर्ल्डकप 2014 विराट कोहली 319 धावांसह अव्वल स्थानी आहे. 2009 टी20 वर्ल्डकपध्ये तिलकरत्ने दिलशान 309 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.