15 सप्टेंबर 2025
Created By: राकेश ठाकुर
आशिया कप 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीतल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेटने धुव्वा उडवला.
पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 128 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने आक्रमक खेळी केली.
अभिषेक शर्माने या सामन्यात फक्त 13 चेंडूत 238.46 च्या स्ट्राईक रेटने 31 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 2 षटकार होते.
अभिषेक शर्माने हा डाव खेळत 11 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवली. तसेच खास पंगतीत बसला.
अभिषेक शर्मा चौथा भारतीय ओपनर आहे ज्याने पाकिस्तान विरुद्ध टी20 सामन्यात 30हून अधिक धावा केल्या. यापूर्वी अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर आणि शिखर धवनने असं केलं होतं.
अभिषेक शर्माने 11 वर्षानंतर 30हून अधिक धावा केल्या. यापू्र्वी शिखर धवनने टी20 वर्ल्डकप 2014 मध्ये असा कारनामा केला होता.
अभिषेक शर्माने युएईविरुद्धही अशीच खेळी केली होती. त्याने 16 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. यात 3 षटकार आणि 2 चौकार होते.