10 सप्टेंबर 2025
Created By: राकेश ठाकुर
आशिया कप 2025 मध्ये भारत युएई विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
या सामन्यात शुबमन गिल अभिषेक शर्मासह भारताकडून सलामीला येतील.
अभिषेक शर्माकडे युएई विरुद्ध मोठा टी20 विक्रम करण्याची उत्तम संधी आहे.
अभिषेक शर्माने जर असे केले तर तो टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवनला मागे टाकेल.
डावखुरा भारतीय फलंदाज म्हणून शिखर धवनच्या नावावर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे.
शिखर धवनने 2018 मध्ये 17 डावांमध्ये एकूण 25 षटकार मारले होते. अभिषेक शर्मा त्याचा विक्रम मोडण्यापासून फक्त काही षटकार दूर आहे.
अभिषेक शर्माने या कॅलेंडर वर्षात 5 डावांमध्ये 22 षटकार मारले आहेत. आता युएई विरुद्ध 4 षटकार मारताच सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनेल.