30 ऑक्टोबर 2025
Created By: संजय पाटील
वुमन्स टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक दिली. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं.
भारतासाठी 339 धावांचा पाठलाग करताना कॅप्टन हरमनप्रीतने 89 धावा केल्या. तर जेमिमा रॉड्रिग्सने विजयात प्रमुख भूमिका बजावली.
जेमीने तिसऱ्या स्थानी येत भारतासाठी शतक ठोकलं आणि विजय मिळवून दिला.
भारताचं या विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जातंय. बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना यानेही महिला ब्रिगेडचं अभिनंदन केलंय.
आयुष्यमानने इंस्टा स्टोरीत जेमिमाचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच आयुष्यमानने जेमिमाहला प्रोत्साहित केलंय.
आयुष्यमानने जेमिमाला तिच्या क्रिकेटमधील प्रवासासाठी सॅल्युट केलं. जेमीमाने केलेल्या खेळीमुळे भारताने 339 धावांचं आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
जेमीमाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरीत नाबाद 127 धावा केल्या. जेमीमाला या खेळीसाठी POTM ने गौरवण्यात आलं.